Tag Archives: स्वमग्न

Vaccines व स्वमग्नता

प्रश्न: Vaccines व स्वमग्नता ह्याचे नक्की काय रिलेशन आहे? ह्यात काही अर्थ आहे? कि autism पालकांची व्यर्थ भीती? माझ्या हाताशी आत्ता आकडे, डेटा नाहीये. मी शोधून देईन परत. परंतू अगदी ‘मस्ट’ अशी वॅक्सिन्सची संख्या खूप कमी आहे! आणि आजकाल त्याच्या तिप्पट तरी व्हॅक्सिन्स दिली जातात हे सत्य आहे. ह्यामागे बिग फार्मा कंपन्यांचा खूप हात असू… Read More »

ऑटीझम अवेअरनेस डे / ऑटीझम अवेअरनेस मंथ

आज काय लिहू कळत नाही. बराच वेळ ऑटीझम अवेअरनेस डे व मंथबाबत काहीतरी लिहीलेच पाहीजे ह्या विचाराने बसले आहे. पण काहीच सुचत नाही. मुलाचा स्प्रिंग ब्रेक चालू असल्याने मागे त्याचा दंगा, कर्कश आवाज काढणे इत्यादी चालू असल्याने ह्या परिस्थितीत काही विचार करून लिहीणे जरा अवघडच.! 🙂 गेल्या फेब्रुवारीपासून मी ऑटीझमवर लिहीत आहे. अजुनही पुष्कळ लिहीण्यासारखे… Read More »

स्वमग्न मुलांबरोबर नाते तयार करण्यासाठी – compliance training

या लेखमालिकेतील ७व्या लेखात तुम्ही Applied Behavior Analysis बद्दल थोडे वाचले. आता जरासे खोलात जाऊन पाहू, एबीए मध्ये नक्की काय काय होते. आमच्या घरी जेव्हा एबीए थेरपिस्ट सर्वप्रथम आली, तेव्हा आम्ही खूप उत्सूक होतो, की आता काय होते. ही काय करतेय.. पण ती आल्यापासून इतकी शांतता घरात. नुसती बबल्स व पेन-कागद व कमालीचा पेशन्स घेऊन… Read More »

‘Au-some’ Toys – Hopper Ball

Ball Hopper ! हे सगळ्यात जास्त रिइन्फोर्सिंग खेळणं आहे आमच्या घरातले. माझ्या मुलातच नव्हे तर बहुतांशी स्पेक्ट्रमवरील मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. तिचा सत्कारणी वापर केला नाही तर त्यांना खूप अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे ही हॉपर बॉल सारखी खेळणी अगदी उपयोगी पडतात. पालक/केअरटेकर/थेरपिस्ट यांना तितके जास्त कष्ट नाही पडत परंतू मुलांची भरपूर एनर्जी खर्ची पडते. माझ्या… Read More »

ऑटीझम व ओसीडी ( ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर)

ऑटीझम कमी की काय म्हणून बर्‍याचदा ऑटीझमबरोबर ओसीडी येतो. माझ्या मुलात बराच काळ असं काही दिसले नाही परंतू गेल्या वर्षभरात हळूहळू ओसीडीने शिरकाव केला आहे. ओसीडी म्हणजे काय? तर ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर. नाव बोलकं आहे. कुठल्या तरी गोष्टीचे तसेच विचारांचे ऑब्सेशन तर त्या ऑब्सेशनच्या बरोबरीने येणारी एखादी कम्पल्सिव्ह कृती. अगदी क्लासिक उदाहरण म्हणजे, काही लोकांना… Read More »

ऑटीझम स्पेशल अ‍ॅक्टीव्हिटीज व कोपिंग टेक्निक्स

प्रत्येकालाच एक कम्फर्ट झोन असतो. ती अमुक एक गोष्ट केली की बरं वाटतं, किंवा अमुक एक पदार्थ खाल्ला, कॉफी प्यायली की बरं वाटतं. अशा सारखेच काही कम्फर्ट झोन्स ऑटीझम असलेल्या मुलांचेही असू शकतात. फक्त फरक हा आहे, की ती मुलं आपल्याला येऊन सांगू शकत नाहीत. त्यामुळे केअरगिव्हरलाच त्यांच्या दृष्टीने विचार करून वेगवेगळ्या अ‍ॅक्टीव्हिटीज कराव्या लागतात.… Read More »

ऑटीझमचे फायदे

शीर्षक वाचून दचकायला झाले ना? मलाही लिहीताना अवघड गेले. पण मुलाच्याबरोबरीनेच माझाही पर्स्पेक्टीव्ह बदलत चालल्याचे लक्षण असावे हे. मी हा लेख लिहीत आहे याचा अर्थ असा नाही की सगळं आलबेल आहे. ऑटीझमच्या बरोबर येणारे त्रास काही कुठे जात नाहीत. इन फॅक्ट त्या त्रासाबद्दलच मी इतके दिवस लिहीत आहे इतक्या लेखांमधून. पण आज जरा वेगळ्या अँगलने… Read More »

जाणिवेचे झाड फोफावू द्या – Grow the Awareness!

२ एप्रिल हा ‘जागतिक ऑटीझम अवेअरनेस डे’ आहे, तर पूर्ण एप्रिल महिना हा ‘ऑटीझम अवेअरनेस मंथ’ आहे. लोकहो, अलिकडेच सीडीसीने ऑटीझमचा नवा प्रीव्हॅलंस रेट प्रकाशित केला तो आहे १:६८. म्हणजे ६८ पैकी एका मुलाला ऑटीझम होतो. यापूर्वीचा रेट १:८८ होता. खालील ग्राफ पाहील्यास फारच भीतीदायक माहीती दृष्टीस पडेल. इतके जास्त प्रमाण का वाढत आहे हा… Read More »

‘Au-some’ Books : “Goodnight Moon” by Margaret Wise Brown

 Goodnight Moon हे १९४७ साली प्रकाशित झालेले बेडटाईम स्टोरीबुक  आहे. जे मी आजही माझ्या मुलाला वाचून दाखवते. झोपायचे नसले तरी  माझा मुलगा दिवसातून कितीदा तरी हे पुस्तक घेऊन त्यातील चित्रं पाहात  बसतो. किती त्या पुस्तकाची कमाल आहे? इतके वर्षं झाली तरी अजुनही  इतका प्रभाव आहे. Very Impressive! माझ्या मुलाला तर कायम हे पुस्तक आठवणीत राहील… Read More »

ऑटीझम प्रवासातील सच्चा मित्र: ABA – Applied Behavior Analysis

 ABA ची मूळ तत्वं फार सोपी आहेत. सोपी म्हणजे वाचायला. आचरणात आणायला  मात्र अवघड. परंतू ऑटीझम पेरेंट्स हे चॅलेंज स्विकारतात, व ABA  पद्धती आचरणात आणायचा  प्रयत्न करतात. ABA therapists त्यासाठी मदतीला असतातच. मुलाच्या प्रत्येक  सेशनमध्ये Parent Compliance Training पालकांना देणे हा महत्वाचा भाग असतो. मुलाच्या थेरपीज चालू होण्यास बराच वेळ लागत होता, त्यामुळे मी वाचनाला… Read More »