0

‘Au-some’ Toys – Lacing Shapes

हे खेळणे आम्ही भारतातून आणले. परंतु इथेही हे मिळते व वापरले जाते. मुख्यत: Hand eye coordination साठी याचा वापर करता येतो. बर्याच ऑटीझम स्पेक्ट्रमवरील मुलांना या मध्ये अडचणी असतात. माझ्या मुलाचे hand eye को-ऑर्डनेशन बरं आहे मात्र ग्रोस मोटार स्किल्स चांगले असूनही तो फारसं नीट वापरत नसल्याने, थेरपीमध्ये या ओवायच्या खेळण्यांचा आवर्जून वापर केला जातो. तसेच फन्क्षंस शिकवण्यासाठी म्हणजे ‘लाल चौकोन दे’, पर्पल सर्कल दे अशा कमांड्स देण्यासाठीही याचा वापर करता येतो. या सारखी लेसिंग toys तुम्हाला येथे मिळतील. Lacing Shapes
lacing_toys
तुम्ही या वेबसाईटवरच्या कुठल्याही खेळण्यांच्या पोस्ट्स बघितल्या, तर तुम्हाला लक्षात येईल, एकाच खेळण्याबरोबर विविध प्रकारांनी खेळता येते. हे तसं बघायला गेले तर अवघड आहे. आपला न्युरो-टिपिकल मेंदू तसा बराच रिचुअलिस्टीक वागू शकतो. थोडंसं क्रिएटीव्हली डोकं वापरण्याची पालकांना गरज पडते, कारण त्यांची मुलं ‘आउट ऑफ बॉक्स’ विचार करणारी असतात. :)s

0

‘Au-some’ Toys – सेन्सरी, fidget toy..

गेल्या दोन वर्षात एक गोष्ट नक्की कळली आहे मला. माझ्या मुलाला सतत हाताला चाळा लागतो काहीतरी. हात नुसते रिकामे ठेवता येत नाहीत त्याला. मग त्यासाठी fidget toys उपयोगी पडतात. उदाहरणार्थ, एखादा स्ट्रेस बॉल, एखादा ईलेस्टीकचा स्ट्रेच होणार बॉल इत्यादी.IMG_0171

तसं काही नसले हातात तर मग चित्रविचित्र उद्योग करतो मुलगा. हात चाटणे. अतिशय जोरजोरात टाळ्या व बुक्क्या मारणे. हे सगळं टाळण्यासाठी सेन्सरी toysची टीम तयार ठेवावी लागते. त्यातले हे एक खेळणे.Toysmith Wacky Tracks, Fidget Toy

लहानांनाच नव्हे तर आपल्यालाही आवडेल हे खेळणे. एकमेकात अडकलेल्या, interlocking रंगीबेरंगी तुकड्याम्शी खेळताना कधी वेळ जातो कळत नाही. थोडंफार स्ट्रेसबस्टर झाल्यासारखेही वाटते. त्यातून एखादा अल्फाबेट लेटर तयार करणे. वेगवेगळे शेप्स/आकार बनवणे असंही खेळता येते. एकंदरीत आवडते खेळणे. 🙂

0

‘Au-some’ Toys – Hopper Ball

618tRQrqqlL._SY450_

Ball Hopper !

हे सगळ्यात जास्त रिइन्फोर्सिंग खेळणं आहे आमच्या घरातले. माझ्या मुलातच नव्हे तर बहुतांशी स्पेक्ट्रमवरील मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. तिचा सत्कारणी वापर केला नाही तर त्यांना खूप अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे ही हॉपर बॉल सारखी खेळणी अगदी उपयोगी पडतात. पालक/केअरटेकर/थेरपिस्ट यांना तितके जास्त कष्ट नाही पडत परंतू मुलांची भरपूर एनर्जी खर्ची पडते. माझ्या मुलाला अजुन स्वत: बॉल हॉपरवर बसून उड्य़ा मारता येत नाहीत. परंतू आम्ही बॉल पायात धरून त्याला धरून उड्या मारायला लावतो, कधी बसवून हॉपिंगला मदत करतो. It also helps their sensory Integration problem in some way!
क्षणात मूड चांगला करण्याचे या बॉलमध्ये पोटेन्शियल आहे! घरी शक्यतो मिनी ट्रॅम्पोलिनच असावे, पण ते महाग असते. एव्हढी इन्व्हेस्टमेंट एकदम करण्याऐवजी एक छोटूसा बॉल आणले की बराचसा हेतू साध्य होतो!

 

You can get it here : 18” Hoppity Ball – Colors Vary

0

‘Au-some’ Toys : Kidoozie Foam Pogo Jumper

foam pogo jumper

माझा मुलगा ३.५ वर्षाचा झाला तरी अजुन दोन्ही पाय उचलून उडी मारत नाही. त्याला मुळातच ते जमत नाही की तो घाबरतो हे कळायला मार्ग नाही. परंतू तो उडी मारत नाही हे खरं. त्यामुळे मी त्याला आजकाल त्याच्याबरोबरीने किंवा त्याला धरून उड्या मारायला शिकवत असते. पण फारसा उपयोग होत नव्हता. जेव्हा मला हे खेळणं दिसले, तेव्हा मात्र मला खात्रीच पटली की इंटरेस्टींग टॉय असणार आहे. त्यामुळे मी लगेच विकत घेतले.
या फोम जंपरवर दोन्ही पाय ठेऊन उभे राहायचे व रबरी स्ट्रेच होणारे हँडल आहे ते पकडून उड्या मारायच्या. उडी मारली की जमिनीवर येताना त्याच्यातून स्क्वीक स्क्वीक असा आवाज होतो, जो अर्थातच मुलांना आवडतो!
अर्थात माझा मुलगा अजुनही उडी मारू शकत नाही. पण महत्वाचे हे आहे की त्याला या खेळण्याशी खेळायचे असते. तो स्वतःहून हे खेळणे ट्राय करायला जातो. नाही जमले तर तो माझ्याकडे घेऊन येतो! (हे असं ऑटीझम असलेली मुलं क्वचितच करतात बरंका. ती मुलं नेहेमी आपला हात पकडून त्या वस्तूकडे जातील. ती वस्तू घेऊन आपल्याकडे येणं हे दुर्मिळ असते.)
माझी खात्री आहे या खेळण्यामुळे माझ्या मुलाला उडी मारण्या इंटरेस्ट तरी वाटू लागेल. कदाचित शिकेलही तो. काही नाही तर माझ्यासाठी चांगला व्यायाम आहे हा! 🙂

हे खेळणं तुम्हाला इथे मिळेल.Kidoozie Foam Pogo Jumper