Monthly Archives: April 2014

‘Au-some’ Toys : Kidoozie Foam Pogo Jumper

माझा मुलगा ३.५ वर्षाचा झाला तरी अजुन दोन्ही पाय उचलून उडी मारत नाही. त्याला मुळातच ते जमत नाही की तो घाबरतो हे कळायला मार्ग नाही. परंतू तो उडी मारत नाही हे खरं. त्यामुळे मी त्याला आजकाल त्याच्याबरोबरीने किंवा त्याला धरून उड्या मारायला शिकवत असते. पण फारसा उपयोग होत नव्हता. जेव्हा मला हे खेळणं दिसले, तेव्हा… Read More »

‘Au-some’ Books : “Sheep in a Jeep” by Nancy E. Shaw

हे एक खूपच गोड पुस्तक आहे! इतकी सुंदर लय आहे शब्दांना. यमकं अगदी नैसर्गिकपणे जुळवल्यासारखी आहेत. शब्दांबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचे काम नक्की पार पाडतं हे पुस्तक. अजुन माझ्या मुलाला पूर्ण गोडी कळायची आहे खरंतर. पण आम्हाला देखील इतकं हसू फुटतं त्याला वाचून दाखवताना. वेड्या शीप धांदरटपणे गाडी चालवतात स्टीप हीलवर. मग स्टिअर करायला विसरतात, समोर… Read More »

ऑटीझम स्पेशल अ‍ॅक्टीव्हिटीज व कोपिंग टेक्निक्स

प्रत्येकालाच एक कम्फर्ट झोन असतो. ती अमुक एक गोष्ट केली की बरं वाटतं, किंवा अमुक एक पदार्थ खाल्ला, कॉफी प्यायली की बरं वाटतं. अशा सारखेच काही कम्फर्ट झोन्स ऑटीझम असलेल्या मुलांचेही असू शकतात. फक्त फरक हा आहे, की ती मुलं आपल्याला येऊन सांगू शकत नाहीत. त्यामुळे केअरगिव्हरलाच त्यांच्या दृष्टीने विचार करून वेगवेगळ्या अ‍ॅक्टीव्हिटीज कराव्या लागतात.… Read More »

ऑटीझमचे फायदे

शीर्षक वाचून दचकायला झाले ना? मलाही लिहीताना अवघड गेले. पण मुलाच्याबरोबरीनेच माझाही पर्स्पेक्टीव्ह बदलत चालल्याचे लक्षण असावे हे. मी हा लेख लिहीत आहे याचा अर्थ असा नाही की सगळं आलबेल आहे. ऑटीझमच्या बरोबर येणारे त्रास काही कुठे जात नाहीत. इन फॅक्ट त्या त्रासाबद्दलच मी इतके दिवस लिहीत आहे इतक्या लेखांमधून. पण आज जरा वेगळ्या अँगलने… Read More »

जाणिवेचे झाड फोफावू द्या – Grow the Awareness!

२ एप्रिल हा ‘जागतिक ऑटीझम अवेअरनेस डे’ आहे, तर पूर्ण एप्रिल महिना हा ‘ऑटीझम अवेअरनेस मंथ’ आहे. लोकहो, अलिकडेच सीडीसीने ऑटीझमचा नवा प्रीव्हॅलंस रेट प्रकाशित केला तो आहे १:६८. म्हणजे ६८ पैकी एका मुलाला ऑटीझम होतो. यापूर्वीचा रेट १:८८ होता. खालील ग्राफ पाहील्यास फारच भीतीदायक माहीती दृष्टीस पडेल. इतके जास्त प्रमाण का वाढत आहे हा… Read More »