‘Au-some’ Books : “Goodnight Moon” by Margaret Wise Brown

By | March 15, 2014

699px-Goodnightmoon Goodnight Moon हे १९४७ साली प्रकाशित झालेले बेडटाईम स्टोरीबुक  आहे. जे मी आजही माझ्या मुलाला वाचून दाखवते. झोपायचे नसले तरी  माझा मुलगा दिवसातून कितीदा तरी हे पुस्तक घेऊन त्यातील चित्रं पाहात  बसतो. किती त्या पुस्तकाची कमाल आहे? इतके वर्षं झाली तरी अजुनही  इतका प्रभाव आहे. Very Impressive!

माझ्या मुलाला तर कायम हे पुस्तक आठवणीत राहील याची मला खात्री  आहे. मी त्याच्यासाठी लॅप एडीशन घेतली होती. त्यामुळे अगदी मोठे  बोर्डबुक आहे ते. पण त्या मोठ्या green room मधील red balloon  शोधायचा. कधी telephone शोधायचा. इटुकला mouse शोधायचा. हे  सगळं माझ्या मुलाला इतकं आवडतं! Goodnight comb, goodnight  brush. Goodnight bowl full of mush.. यातील नाद आवडतो. तर कधी  Goodnight nobody म्हणायला आवडते, for no reason! 🙂

अतिशय गोड पुस्तक आहे. नक्की घ्या एखाद्या पिल्लासाठी .. You can find this book here.

Leave a Reply