0

‘Au-some’ Books – Numbers, colors, shapes (Priddy Book)

priddybooks1मला स्वत:ला पुस्तकं प्रचंड आवडतात. त्यामुळे मुलासाठी पुस्तक खरेदी हा कायमच आवडीचा भाग वाटत आला आहे.
माझा मुलगा अगदी छोटा असताना घेतलेले हे पुस्तक. सध्या आमच्या घरात याची दुसरी आवृत्ती चालू आहे. पहिली वापरून फाडून टाकण्यात आली. छोटेसे बोर्ड बुक. बेसिक कन्सेप्ट्स. रंग, नंबर्स, शेप्स. थोडे बेसिक प्राणी, वस्तू, पेन-पेन्सिल, बॉल..priddybook2
खूप लहानपणी त्याला हे पुस्तक नुसते बघत बसायला आवडायचे. नंतर साधारण २ वर्षाचा असताना, एकदा सहज त्याला विचारले असता त्याने ग्रीन फ्रॉग कुठे आहे ते दाखवले. आम्हाला पत्ताही नाही कि याला ग्रीन फ्रॉग ठाऊक आहे ते! 🙂

गेल्या दोन वर्षात एबीए थेरपिस्ट्स या पुस्तकाचा पुरेपूर वापर करतात. Touch tomato. Touch shoes. यासारख्या बेसिक कमांड्सने सुरवात करून आता आम्ही Touch something that you can eat. Touch something that you can wear. या सारख्या बर्यापैकी कठीण कमांड्स किंवा फंक्शन ज्याला म्हणतात ती कन्सेप्ट शिकत आहोत. हे सगळं या एका पुस्तकावर! 🙂 जरून तुमच्या पिल्लासाठी घ्या. झोपायच्या आधी त्याला चित्र दाखवून शब्द सांगा. शक्य आहे तिथे sign language शिकवा.
तुम्हाला हे पुस्तक येथे मिळेल. Numbers Colors Shapes – Priddy Books

0

‘Au-some’ books : Chicka Chicka Boom Boom

by : Bill Martin Jr John Archambault Lois Ehlert 

Tag_book-Chicka_Chicka_Boom_Boomchickaboom_page

 

 

Alphabets !

एके दिवशी नारळाच्या झाडावर चढायची शर्यत लावतात.
एक एक करत सगळे जातात वर परंतू धाडकन खाली येतात.
मग परत शर्यत चालू.

इतक्याश्या स्टोरीलाईनचे हे क्यूट पुस्तक! 🙂

You can get it here :Chicka Chicka Boom Boom

0

‘Au-some’ Books : “Sheep in a Jeep” by Nancy E. Shaw

61-pHkP3zKL._SX258_BO1,204,203,200_

हे एक खूपच गोड पुस्तक आहे! इतकी सुंदर लय आहे शब्दांना. यमकं अगदी नैसर्गिकपणे जुळवल्यासारखी आहेत. शब्दांबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचे काम नक्की पार पाडतं हे पुस्तक. अजुन माझ्या मुलाला पूर्ण गोडी कळायची आहे खरंतर. पण आम्हाला देखील इतकं हसू फुटतं त्याला वाचून दाखवताना.
SheepPage
वेड्या शीप धांदरटपणे गाडी चालवतात स्टीप हीलवर. मग स्टिअर करायला विसरतात, समोर पाहायलाच विसरतात. चिखलात फसतात. शेवटी अनेक अपघात होऊन ती जीप भंगारात विकायला काढतात. 🙂
फारच गोड पुस्तक!

हे पुस्तक तुम्हाला इथे मिळेल. Sheep in a Jeep

0

‘Au-some’ Books : “Goodnight Moon” by Margaret Wise Brown

699px-Goodnightmoon Goodnight Moon हे १९४७ साली प्रकाशित झालेले बेडटाईम स्टोरीबुक  आहे. जे मी आजही माझ्या मुलाला वाचून दाखवते. झोपायचे नसले तरी  माझा मुलगा दिवसातून कितीदा तरी हे पुस्तक घेऊन त्यातील चित्रं पाहात  बसतो. किती त्या पुस्तकाची कमाल आहे? इतके वर्षं झाली तरी अजुनही  इतका प्रभाव आहे. Very Impressive!

माझ्या मुलाला तर कायम हे पुस्तक आठवणीत राहील याची मला खात्री  आहे. मी त्याच्यासाठी लॅप एडीशन घेतली होती. त्यामुळे अगदी मोठे  बोर्डबुक आहे ते. पण त्या मोठ्या green room मधील red balloon  शोधायचा. कधी telephone शोधायचा. इटुकला mouse शोधायचा. हे  सगळं माझ्या मुलाला इतकं आवडतं! Goodnight comb, goodnight  brush. Goodnight bowl full of mush.. यातील नाद आवडतो. तर कधी  Goodnight nobody म्हणायला आवडते, for no reason! 🙂

अतिशय गोड पुस्तक आहे. नक्की घ्या एखाद्या पिल्लासाठी .. You can find this book here.