0

@AutismMarathi followed by @DrTempleGrandin! :)

मला फार आनंद झाला आहे. तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करावासा वाटला. डॉ. टेंपल ग्रांडीन नाव घेतलं की कानाला हात जातो इतके आदरणीय व्यक्तीमत्व. स्वतः १९४९ मध्ये वय वर्षे २ असताना ऑटीझम(ब्रेन डॅमेज) डायग्नोसिस मिळालेल्या टेंपल ग्रांडीन – त्यांना मिळालेल्या चांगल्या शिक्षिकांमुळे त्याच्बरोबर अतिशय जिद्दीच्या, धडाडीच्या आईमुळे पुढे बोलू लागल्या, शिक्षण घेतले,अ‍ॅनिमल सायन्समध्ये पीएचडी देखील केली. ऑटीस्टीक लोकांसाठी हग मशिन त्यांनी डिझाईन केले. व मुख्य म्हणजे ऑटीझमच्या त्या अगदी महत्वाच्या प्रवक्त्या आहेत. ऑटीझमवरील त्यांची भाषणं, कॉन्फरन्सेस प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पुस्तकं देखील! ‘द वे आय सी इट’, ‘डिफरंट.. नॉट लेस’ ही पुस्तकं वाचनीय व अभ्यास करण्याजोगी आहेत. या डॉ. टेंपल ग्रांडीन यांन मी दोन दिवसांपूर्वी ट्विटरवर फॉलो करू लागले आणि आज दुपारी हे नोटिफिकेशन माझ्या फोनवर!

Dr.TempleGrandin

WOW! Dr. Temple Grandin!? Such Notable, remarkable and famous person from Autism community/ Autism activist following me? 🙂

I know she might have whole PR team to manage her twitter account and everything. And what do you really need to follow a person on twitter? But anyway, this gave me real shock( good one) when I received this notification on my iphone.
For more information read: http://www.grandin.com/

au-some-mom

Leave a Reply