Categories: 'Au-some' Books

‘Au-some’ Books – Numbers, colors, shapes (Priddy Book)

मला स्वत:ला पुस्तकं प्रचंड आवडतात. त्यामुळे मुलासाठी पुस्तक खरेदी हा कायमच आवडीचा भाग वाटत आला आहे.
माझा मुलगा अगदी छोटा असताना घेतलेले हे पुस्तक. सध्या आमच्या घरात याची दुसरी आवृत्ती चालू आहे. पहिली वापरून फाडून टाकण्यात आली. छोटेसे बोर्ड बुक. बेसिक कन्सेप्ट्स. रंग, नंबर्स, शेप्स. थोडे बेसिक प्राणी, वस्तू, पेन-पेन्सिल, बॉल..
खूप लहानपणी त्याला हे पुस्तक नुसते बघत बसायला आवडायचे. नंतर साधारण २ वर्षाचा असताना, एकदा सहज त्याला विचारले असता त्याने ग्रीन फ्रॉग कुठे आहे ते दाखवले. आम्हाला पत्ताही नाही कि याला ग्रीन फ्रॉग ठाऊक आहे ते! 🙂

गेल्या दोन वर्षात एबीए थेरपिस्ट्स या पुस्तकाचा पुरेपूर वापर करतात. Touch tomato. Touch shoes. यासारख्या बेसिक कमांड्सने सुरवात करून आता आम्ही Touch something that you can eat. Touch something that you can wear. या सारख्या बर्यापैकी कठीण कमांड्स किंवा फंक्शन ज्याला म्हणतात ती कन्सेप्ट शिकत आहोत. हे सगळं या एका पुस्तकावर! 🙂 जरून तुमच्या पिल्लासाठी घ्या. झोपायच्या आधी त्याला चित्र दाखवून शब्द सांगा. शक्य आहे तिथे sign language शिकवा.
तुम्हाला हे पुस्तक येथे मिळेल. Numbers Colors Shapes – Priddy Books

au-some-mom

Recent Posts

पोळीबंद आहार!

खूप पूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे फारच जुनी. तेव्हा चाकाचा, अग्नीचा, शेतीचा, चित्रकलेचा कशाचाही शोध लागला नव्हता. अश्मयुग. दोन वेळच्या जेवणाची…

7 years ago

Vaccines व स्वमग्नता

प्रश्न: Vaccines व स्वमग्नता ह्याचे नक्की काय रिलेशन आहे? ह्यात काही अर्थ आहे? कि autism पालकांची व्यर्थ भीती? माझ्या हाताशी…

8 years ago

५ रात्रींची कथा

गेल्या विकेंडला मला थोडे बरे नव्हते. डोकेदुखी, दातदुखी, घसादुखी अशी बरीच दुखणी एकदम आली. शनीवार रात्र अजिबात झोप लागली नाही.…

8 years ago

ऑटीझम कॉन्फर्न्सचा अनुभव, ग्लुटेन आहारात असण्याचे दुष्परिणाम इत्यादी.

मी नुकतीच एका 'ऑटीझम कॉन्फरन्स'ला जाऊन आले. http://tacaautismconference.com/ कॅलिफॉर्नियातील कोस्टा मेसा ह्या गावात ही कॉन्फरन्स आयोजित केली होती. आयोजक होते,…

9 years ago

Special Olympics World Summer Games – LA 2015

तुम्हा सर्वांना 'ऑलिम्पिक्स' माहीत असेलच! जसं ऑलिम्पिक्समध्ये सर्व जगभरातून खेळाडूंसाठी वेगवेगळे क्रीडाप्रकार असतात, त्याच प्रमाणे 'स्पेशल ऑलिम्पिक्स' मध्ये सर्व जगभरातून…

9 years ago

… And he ‘said’ I Love You !

सर्वांना येऊ घातलेल्या मदर्स डेसाठी शुभेच्छा!! मी जी गोष्ट सांगत आहे ती तशी झाली १५ दिवस जुनी. पण ह्या मदर्स…

9 years ago