0

‘Au-some’ Books – Numbers, colors, shapes (Priddy Book)

priddybooks1मला स्वत:ला पुस्तकं प्रचंड आवडतात. त्यामुळे मुलासाठी पुस्तक खरेदी हा कायमच आवडीचा भाग वाटत आला आहे.
माझा मुलगा अगदी छोटा असताना घेतलेले हे पुस्तक. सध्या आमच्या घरात याची दुसरी आवृत्ती चालू आहे. पहिली वापरून फाडून टाकण्यात आली. छोटेसे बोर्ड बुक. बेसिक कन्सेप्ट्स. रंग, नंबर्स, शेप्स. थोडे बेसिक प्राणी, वस्तू, पेन-पेन्सिल, बॉल..priddybook2
खूप लहानपणी त्याला हे पुस्तक नुसते बघत बसायला आवडायचे. नंतर साधारण २ वर्षाचा असताना, एकदा सहज त्याला विचारले असता त्याने ग्रीन फ्रॉग कुठे आहे ते दाखवले. आम्हाला पत्ताही नाही कि याला ग्रीन फ्रॉग ठाऊक आहे ते! 🙂

गेल्या दोन वर्षात एबीए थेरपिस्ट्स या पुस्तकाचा पुरेपूर वापर करतात. Touch tomato. Touch shoes. यासारख्या बेसिक कमांड्सने सुरवात करून आता आम्ही Touch something that you can eat. Touch something that you can wear. या सारख्या बर्यापैकी कठीण कमांड्स किंवा फंक्शन ज्याला म्हणतात ती कन्सेप्ट शिकत आहोत. हे सगळं या एका पुस्तकावर! 🙂 जरून तुमच्या पिल्लासाठी घ्या. झोपायच्या आधी त्याला चित्र दाखवून शब्द सांगा. शक्य आहे तिथे sign language शिकवा.
तुम्हाला हे पुस्तक येथे मिळेल. Numbers Colors Shapes – Priddy Books

au-some-mom

Leave a Reply