माझा मुलगा ३.५ वर्षाचा झाला तरी अजुन दोन्ही पाय उचलून उडी मारत नाही. त्याला मुळातच ते जमत नाही की तो घाबरतो हे कळायला मार्ग नाही. परंतू तो उडी मारत नाही हे खरं. त्यामुळे मी त्याला आजकाल त्याच्याबरोबरीने किंवा त्याला धरून उड्या मारायला शिकवत असते. पण फारसा उपयोग होत नव्हता. जेव्हा मला हे खेळणं दिसले, तेव्हा मात्र मला खात्रीच पटली की इंटरेस्टींग टॉय असणार आहे. त्यामुळे मी लगेच विकत घेतले.
या फोम जंपरवर दोन्ही पाय ठेऊन उभे राहायचे व रबरी स्ट्रेच होणारे हँडल आहे ते पकडून उड्या मारायच्या. उडी मारली की जमिनीवर येताना त्याच्यातून स्क्वीक स्क्वीक असा आवाज होतो, जो अर्थातच मुलांना आवडतो!
अर्थात माझा मुलगा अजुनही उडी मारू शकत नाही. पण महत्वाचे हे आहे की त्याला या खेळण्याशी खेळायचे असते. तो स्वतःहून हे खेळणे ट्राय करायला जातो. नाही जमले तर तो माझ्याकडे घेऊन येतो! (हे असं ऑटीझम असलेली मुलं क्वचितच करतात बरंका. ती मुलं नेहेमी आपला हात पकडून त्या वस्तूकडे जातील. ती वस्तू घेऊन आपल्याकडे येणं हे दुर्मिळ असते.)
माझी खात्री आहे या खेळण्यामुळे माझ्या मुलाला उडी मारण्या इंटरेस्ट तरी वाटू लागेल. कदाचित शिकेलही तो. काही नाही तर माझ्यासाठी चांगला व्यायाम आहे हा! 🙂
हे खेळणं तुम्हाला इथे मिळेल.Kidoozie Foam Pogo Jumper