गेल्या दोन वर्षात एक गोष्ट नक्की कळली आहे मला. माझ्या मुलाला सतत हाताला चाळा लागतो काहीतरी. हात नुसते रिकामे ठेवता येत नाहीत त्याला. मग त्यासाठी fidget toys उपयोगी पडतात. उदाहरणार्थ, एखादा स्ट्रेस बॉल, एखादा ईलेस्टीकचा स्ट्रेच होणार बॉल इत्यादी.
तसं काही नसले हातात तर मग चित्रविचित्र उद्योग करतो मुलगा. हात चाटणे. अतिशय जोरजोरात टाळ्या व बुक्क्या मारणे. हे सगळं टाळण्यासाठी सेन्सरी toysची टीम तयार ठेवावी लागते. त्यातले हे एक खेळणे.Toysmith Wacky Tracks, Fidget Toy
लहानांनाच नव्हे तर आपल्यालाही आवडेल हे खेळणे. एकमेकात अडकलेल्या, interlocking रंगीबेरंगी तुकड्याम्शी खेळताना कधी वेळ जातो कळत नाही. थोडंफार स्ट्रेसबस्टर झाल्यासारखेही वाटते. त्यातून एखादा अल्फाबेट लेटर तयार करणे. वेगवेगळे शेप्स/आकार बनवणे असंही खेळता येते. एकंदरीत आवडते खेळणे. 🙂
खूप पूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे फारच जुनी. तेव्हा चाकाचा, अग्नीचा, शेतीचा, चित्रकलेचा कशाचाही शोध लागला नव्हता. अश्मयुग. दोन वेळच्या जेवणाची…
प्रश्न: Vaccines व स्वमग्नता ह्याचे नक्की काय रिलेशन आहे? ह्यात काही अर्थ आहे? कि autism पालकांची व्यर्थ भीती? माझ्या हाताशी…
गेल्या विकेंडला मला थोडे बरे नव्हते. डोकेदुखी, दातदुखी, घसादुखी अशी बरीच दुखणी एकदम आली. शनीवार रात्र अजिबात झोप लागली नाही.…
मी नुकतीच एका 'ऑटीझम कॉन्फरन्स'ला जाऊन आले. http://tacaautismconference.com/ कॅलिफॉर्नियातील कोस्टा मेसा ह्या गावात ही कॉन्फरन्स आयोजित केली होती. आयोजक होते,…
तुम्हा सर्वांना 'ऑलिम्पिक्स' माहीत असेलच! जसं ऑलिम्पिक्समध्ये सर्व जगभरातून खेळाडूंसाठी वेगवेगळे क्रीडाप्रकार असतात, त्याच प्रमाणे 'स्पेशल ऑलिम्पिक्स' मध्ये सर्व जगभरातून…
सर्वांना येऊ घातलेल्या मदर्स डेसाठी शुभेच्छा!! मी जी गोष्ट सांगत आहे ती तशी झाली १५ दिवस जुनी. पण ह्या मदर्स…