‘ब्रेन ऑन फायर’ – पुस्तक परीक्षण

By | April 15, 2015

***** ज्यांना पुस्तक वाचायचे आहे, त्यांच्यासाठी स्पॉयलर अलर्ट *****

Brain_on_Fire_Susannah_Cahalan

माझ्या मुलाच्या ऑटीझममुळे माझा वाचनाचा प्रकारच बदलून गेला आहे. दोन वर्षापूर्वी मी हे पुस्तक उचलले नसते. परंतू आता ब्रेन रिलेटेड काही असले तर कळत असो वा नसो मी वाचायचा प्रयत्न करतेच.

सुझाना ही एक २४ वर्षाची न्यू यॉर्क पोस्ट ह्या ठिकाणी काम करणारी पत्रकार. न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी एकटीने स्टुडिओ अपार्टमेंट घेऊन, पत्रकारितेसारखा हेक्टीव व स्ट्रेसफुल जॉब सांभाळणारी मुलगी. एका महिन्यात तिच्या झालेल्या पत्रकार ते ऑल्मोस्ट इन्सेन पर्सन ह्या स्थित्यंतराची ही कहाणी.

सुरवात होते, ती सुझानाला वाटत असलेल्या घरात बेडबग्ज झाले आहेत ह्या विचारधारणेतून. दोन-तीनदा एक्स्टर्मिनेटर करणार्‍या लोकांना बोलवूनही ती लोकं अपार्टमेंट क्लिन व बग्ज-फ्री असल्याचा निर्वाणा देतात. मात्र सुझानाला डाव्या हातावर बग्जबाईटच्या खुणा दिसतात. तिची खात्रीच असते घरात बेडब्ग्ज आहेत ह्याची. मग ती घर घासूनपुसून साफ करायला घेते. ते आवरता आवरता तिला अचानक बरं नसल्याचे जाणवू लागते. तिला वाटते बहुतेक तिला फ्लू झाला आहे. तिला मायग्रेनचा त्रास होतो. कामाचा स्ट्रेस असेल असं समजून ती मन शांत करायला म्हणून बॉयफ्रेंडच्या घरी जाते. तिथे कधी नव्हे ते पॅरॅनॉईड होऊन बॉयफ्रेंडच्या एक्स गर्लफ्रेंडबद्दल अवास्तव विचार करत बसते. बॉयफ्रेंडच्या इमेल्स, घरातील कपाटं ह्यांची झडती घेते.
नंतर तिला जाणीव होतेच की हे असं वागणं काही बरोबर नाही. एकीकडे अधुनमधुन तिच्या डाव्या हाताला व पायाला मुंग्या येतात. नव्याने घेत असलेल्या बर्थ कंट्रोल पॅचमुळे होत असावे म्हणून गायनॅकशी बोलल्यानंतर तो सजेस्ट करतो न्युरॉलॉजिस्टला भेट. ती तिथे जाते. फॉर्म्/माहिती भरते. पाचेक वर्षांपूर्वी तिला पाठीवर मेलानोमा(कॅन्सर) डिटेक्ट झालेला असतो. पण अतिशय लवकर सापडल्याने एका सर्जरीवर काम भागलेले असते. तिला काही फारसे टेन्शन नसते. तिच्या मनस्थितीची जाणिव आपल्याला एका वाक्यातून अगदी नीटच समजते. ” Despite this premature cancer scare, I had remained nonchalant, some would say immature, about my health; I was about as far from hypochondriac as you can get. ”

न्युरॉलॉजिस्ट नेहेमीच्या तपासण्या करून सर्व रिफ्लेक्सेस बरोबर आहेत असा निर्वाळा देतो. ब्लड टेस्ट करून त्या देखील ठिक आहेत असं सांगतो. MRI काढला जातो. तोही नॉर्मल येतो. फक्त गळ्यापाशीच्या लिम्फ नोड्स एन्लार्ज्ड झालेल्या आढळतात. ज्या कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन मध्ये होतात. तेव्हा कदाचित कुठलेतरी व्हायरल इन्फेक्शन आहे इतपतच समजते.

हळूहळू सुझानाला अन्नपदार्थ नकोसे वाटू लागतात. सगळे सेन्सेस हाईटन्ड झाल्यासारखे, अन्नपदार्थातले तेल, ग्रीझीनेस डोळ्यात भरायला लागून नॉशिअस वाटते. कधी टाईम्स स्क्वेअरचे लाईट्स अंगावर येतात. तिचे वजन कमी होत होते. रात्री व्यवस्थित झोप लागणे कमी होत चालले होते. विचारांना लगाम राहात नव्हता. बोलताना अचानक स्पीड खूप वाढायला लागला. कधी निराशेचे झटके येऊन ढसाढसा रडणे तर कधी आनंदाचे झाड! अन एकदा दोनदा तर तिला असे वाटले की ती तिच्या शरीरातून निघून वर वर उंच तरंगत आहे व खाली असलेल्या स्वतःकडे बघते आहे! तिचे खाणे कमी होत चालले होतेच, पण ती थोडी थोडी वाईन घेत होती. (ज्यावरूनच तिच्या न्युरॉलॉजिस्टला वाटले की “शी इज जस्ट पार्टीईंग टू हार्ड!)

अन त्या रात्री, टीव्हि पाहता पाहता सुझानाला Seizure चा अ‍ॅटॅक आला. तोंडातून विचित्र आवाज, ओठांची, हाताची सतत हालचाल.. श्वास घेणे प्रचंड वाढले पण उच्छ्वास मात्र बाहेर पडत नव्हता.. तोंडून रक्त व फेस..

खूप पळापळ करून सुझानाला अ‍ॅडमिट केले गेले. आणि इथेच तिच्या न्युरॉलॉजिस्टने तिला अल्कोहोल विथ्ड्रावल सिम्प्टम्समुळे असे होत आहे असे सांगून चूक केली.. पुढे तिला घरी पाठवले, अँटी-सीझर मेडिकेशन देऊन.. पण तिचे वागणे मात्र बदलतच गेले. सीझर्स तर येतच होती.. कधी पॅरानॉईया तर कधी सतत संशयी, कधी चित्रविचित्र भास/ हॅल्युसिनेशन्स. मग ती बायपोलर डिसॉर्डरपासून पीडीत आहे असे तिनेच स्वतः ठरवणे. मग कधी न्यूयॉर्कमध्ये राहणे हेक्टीक बनत आहे असे वाटणे.. तिच्या वडिलांच्या घरी मात्र सगळी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे जाणवले व तिला दुसर्‍या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये हलवले.

आणि इथे सुरू झाला एक कोडे उकलण्याचा प्रवास. कारण सुझानाची एकही ब्लड टेस्ट पॉझीटीव्ह येत नव्हती. तिचे रिपोर्ट्स बघितले तर एखाद्याला वाटेल किती हेल्दी व्यक्ती आहे ही! परंतू तिच्याकडे बघितले तर ती ‘ती’ राहीलीच नव्हती. तिचे बोलणेही बदलायला लागले होते. शब्द हळूहळू बरळल्यासारखे येऊ लागले.. चेहर्‍याच्या हालचाली मंदावल्या.. एक्स्प्रेशन्सलेस, इमोशनलेस चेहरा व व बोलणे झाले होते. सुझाना ही एक मिस्टेरिअस केस होऊन बसली. शेवटी डॉ. हाऊस मानल्या जाणार्‍या डॉ. सोहेल नाज्जर यांना बोलावण्यात आले. त्यांनी स्पायनल टॅप – म्हणजे लंबर प्रेशर , मणक्यातील फ्लुईड काढून घेऊन तो लॅब्मध्ये पाठवले. मात्र एकूणएक ऑटो-इम्युन टेस्ट निगेटीव्ह. कुठेच प्रॉब्लेम दिसेना.

एके दिवशी डॉ. नाज्जर सुझानाशी गप्पा मारत असताना त्यांनी तिला भरपूर प्रश्न विचारले. तिला बर्‍याच प्रश्नांची उत्तरं बरोबर जमली नाहीत किंवा जितक्या फास्ट हेल्दी ब्रेन रिअ‍ॅक्ट होईल तितका तिचा होत नव्हता. शेवटी डॉक्टरांनी तिला घड्याळाचे चित्र काढायला संगितले. १ ते १२ आकडे काढून घड्याळ काढ. तिने असे चित्र काढले.

clock

ह्यावरून डॉ.नाज्जरांना व्यवस्थित समजले की सुझानाचा राईट ब्रेन अफेक्टेड आहे. आपले ब्रेन्स तिरके काम करतात. म्हणजे डावा ब्रेन उजवी बाजू बघतो तर उजवा ब्रेन डावी. ह्या चित्रात सुझानाने एक ते १२ पूर्ण आकडे लिहीले. म्हणजे तिचे डोळे ती माहिती ब्रेनला पोचवत होते की घड्याळात एक ते बारा आकडे असतात. पण तिचा उजवा ब्रेन इन्फेक्टेड असल्याने त्याने डावी बाजू पूर्णपणे दुर्लक्षित केली. अन ह्यावरून तिच्या केसला एक मोठा टर्निंग पॉईंट मिळाला. व बर्‍याच टेस्ट करून फायनली तिला ब्रेन इन्फ्लॅमेशन झाले आहे असे निष्पन्न झाले. हे कशाने झाले हे कळण्याचा मात्र एकच मार्ग होता तो म्हणजे ब्रेन बायॉप्सी. ब्रेनचा एक छोटा सँपल घेऊन बर्‍याच टेस्ट्नंतर शेवटी anti nmda receptor encephalitis हा अतिशय रेअर ऑटोइम्युन डिसिझ समोर आला.

*****************************************************************************************************
त्याच्यावर उपाय म्हणून भरपूर स्टेरॉईड्स, Intravenous immunoglobulin इत्यादी ट्रीटमेंटनंतर सुझाना हळूहळू पूर्वीची सुझाना बनत गेली. अर्थात इथेही बरेच चढउतार होतेच. तिचा पूर्ण प्रवासच इतका ड्रामाटीक आहे! अन ही लेखिका स्वतःबद्दल बोलत असल्याने ही सत्य घटना आहे हे पचायला देखील अवघड जात होते. मात्र असे असताना पुस्तकाचा पार्ट ३ समोर आला अन मी चमकले. सुझानाने असे लिहीले आहे की हा ऑटोइम्युन डिसिझ इतका रेअर आहे/ होता की पटकन लक्षात येत नाही. त्यामुळे जी लोकं व मुलं स्किझोफ्रेनिया किंवा ऑटीझम अशी डायग्नॉज्ड झाली त्यांच्यापैकी काहींना इन फॅक्ट anti nmda receptor encephalitis हा प्रॉब्लेम असण्याची २-५% जरी धरली तरी खूप आहे! आणि सुझानानी लिहीली ती स्टेरॉईड्स, आयव्हिआय्जी ही ट्रीटमेंट मिलिअन डॉलर्सची असली तरी निदान ती ट्रीटमेंट आहे. कोणाचा स्किझोफ्रेनिया किंवा ऑटीझम हा मुळामध्ये anti nmda receptor encephalitis आहे हे कळले तर त्या व्यक्तीच्या बर्‍याच प्रॉब्लेम्सना उत्तर मिळू शकते!

इतका वेळ एका कोणा न्यू यॉर्कमधल्या रिपोर्टरची ब्रेनच्या आजाराची सुरस परंतू डिस्टर्बिंग कथा अशा नजरेने मी पुस्तक वाचत होते. इतक्या धक्कादायकरित्या त्यात ऑटीझमची लिंक आली! आता ह्या इन्फॉर्मेशनचे काय करायचे प्रश्नच आहे! आता विचार करता, बायोमेडीकल डॉक्टरने ह्याबद्दल काहीतरी अंधुक सांगितले होते असेही आठवू लागले. त्यामुळे ह्या माहितीचा मला किती उपयोग होईल माहित नाही, मात्र anti nmda receptor encephalitis आणि ऑटीझम असा रिसर्च मात्र माझा चालू झालाच!

******************************************************************************************************

सुझानाने सुरवातीला लिहीलेली बेडब्ग्ज आहेत असे वाटणे, बरोबर डाव्याच हाताला बग्ज बाईट ‘दिसणे’, डाव्या साईडला नम्बनेस जाणवणे ही सगळी राईट ब्रेन इन्फेक्टेड्/अफेक्टेड/इन्फ्लेम्ड असण्याची लक्षणं दिसून येत होती. चित्रविचित्र भास, आशा-निराशेचे हेलकावे, स्वतःच तरंगत गेल्यासारखे वाटून स्वतःकडे बघणे हे सगळं ह्या ऑटोइम्युन डिसिझची व ब्रेन इन्फ्लॅमेशनचीच कमाल होती. सुझानाने तर द एग्झॉर्सिस्ट ह्या मुव्हीशी देखील साम्य जोडून दाखवले! त्या मुव्हीतील मुलीला कसे कोणीतरी झपाटले होते, तसंच काहीसे सुझानाचे त्या महिन्याभरात झाले होते. ‘अ मंथ ऑफ मॅडनेस’.. एक महिना, तिच्या वागण्याचे निदान कोणालाही होऊ शकले नाही, व तिची परिस्थिती मॅड, मॅड इन्सेन व्यक्तीसारखी होऊन गेली.. ऑल बिकॉझ ऑफ अनडायग्नॉज्ड ब्रेन इन्फ्लॅमेशन!

ब्रेन इन्फ्लॅमेशन झाल्यास काय काय बदल होऊ शकतात, कुठल्या ब्रेनच्या भागाने काय फरक होतो. अगदी शास्त्रशुद्ध तरीही सहज समजेल अशा भाषेत इतकी माहिती आहे ह्या पुस्तकात!! परत परत वाचावे लागेल परंतू अतिशय इन्फर्मेटीव्ह व सत्यघटना असल्याने त्यात एक सस्पेन्स भरून राहीला आहे! प्रत्येकाने आवर्जून वाचावे. व आपल्या उत्तम स्थितीत असलेल्या ब्रेनचे धन्यवाद मानावेत असं पुस्तक आहे हे!

पुस्तकातीलच कोणाचे तरी कोट एकदम अ‍ॅप्ट आहे : the brain is a monstrous beautiful mess !

Leave a Reply