0

Gluten or Food Sensitivities – यांमुळे स्वमग्न मुलांवर होणारा परीणाम

बायोमेडीकलच्या दोन लेखांमध्ये ग्लुटेन अथवा इतर फुड सेन्सेटीव्हिटीबद्दल मोघम वाचले. आता नीट पाहू. सपोज एखाद्याला दाण्याची / एगची अ‍ॅलर्जी आहे. ते खाल्ल्याने रॅश येतो, ओठ सुजतात, क्वचित श्वासनलिका सुजून श्वास घ्यायला त्रास होतो. ती व्यक्ती काय करेल? ते पदार्थ टाळेल , हो ना? की असं काही नसतं , ही क्वॅकरी आहे, फॅड आहे म्हणून तेच पदार्थ खाऊन स्वतःला त्रास करून घेईल? याचे उत्तर नाहीच येईल. ते पदार्थ तो माणुस टाळायला बघेल. या अ‍ॅलर्जीजबद्दल मी पुढील लेखात नीट लिहीले आहे. पण थोडक्यात ग्लुटेन सेन्सिटीव्हिटीने त्या व्यक्तीला दृश्य रॅश वगैरे त्रास नसेल परंतू बिहेविअर चेंजेस होत अस्तील तर त्या व्यक्तीने ग्लुटेन टाळावे हेच बरे. नाही का? मग ब्लड टेस्ट करून ग्लुटेन सेन्सिटीव्हिटी आहे का हे शोधता येत असेल तर त्यात क्वॅकरी काय आहे? विचार करा. इतके व्हॅक्सिनेशन स्केज्यूल का असते? फ्लू चा शॉट आपण लहानपणी घेतला होता का कधी? मला एव्हढंच म्हणायचे आहे, हे जे क्वेश्चनिंग आपण नवीन पद्धतींवर करतो तसेच रूळलेल्या पद्धतींना क्वेश्चन केले पाहीजे. साधे डाएट चेंजेस करण्यामध्ये एखाद्या डॉक्टरला झटकून टाकण्याइतके गैर काय वाटते? सपोज मी चायनामध्ये राहून त्या डॉक्टरला सांगितले की मी ऑक्टोपस खाणार नाही (फॉर व्हॉटेव्हर रिझन) तर म्हणेल का, नाही तुम्ही खाल्लाच पाहीजे. ऑक्टोपस न खाल्ल्याने काहीही वेगळे फायदे मिळत नाहीत. अरे पण आम्ही नाहीच खात! तसेच आम्ही ठरवले की आम्ही जीएफ्/सीएफ डाएट खाणार, तर कोणाला त्यात आडकाठी करण्याची गरज का वाटावी? आम्ही काही मुलाला उपाशी ठेवणार नाही आहोत. उलट जास्तीत जास्त पोषक अन्न कसं जाईल हे बघत आहोत. सेव्हन सीज नावाच्या कॉड लिव्हर गोळ्या मी देखील वाढीच्या काळात घेतल्या. मग फिश ऑईल्/कॉड लिव्हर ऑईलचे सप्लिमेंट देण्यात काय प्रॉब्लेम आहे? आणि त्याने आय काँटॅक्ट सुधारतो, समज सुधारत आहे असं जर पालक येऊन सांगत असतील तर त्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे?
ज्या गव्हावर आपण इतका विश्वास टाकत आहोत, तो गहू गेल्या काळात किती बदलला हे समजून घ्यायचे असेल तर ‘व्हीट बेली’ नावाचे पुस्तक वाचा. काही जनरेशन्स पूर्वी जो उत्तम प्रतीचा गहू मिळायचा तसा तो आता नसतो.सध्या विविध पेस्टीसाईड्स असतात. हे मी विशेषतः अमेरिकेचे बोलत आहे. भारतात नक्की काय परिस्थिती आहे माहीत नाही. परंतू इथे पूर्वी मिळणारी चिकन अ‍ॅव्हरेज साईजची असायची, आता चिकन ऑन स्टेरॉईड्स वाटते. पूर्वी गाईम्हशी चारा खायच्या, आता त्यांना कम्पल्सरी कॉर्न खायला घातला जातो जे अनैसर्गिक आहे, त्यामुळे जे दूध मिळते तेदेखील पूर्‍वी मिळणार्‍या दुधाइतके पोषक नसते. शिवाय गाईंना ग्रोथ हार्मोन्स टोचलेले असतात, असे दूध प्यायल्याने सध्याच्या जनरेशनमध्ये अगदी लहान मुली वयात येण्याचे प्रमाण वाढले आहे. साखरेपेक्षा स्वस्त व पूर्णपणे लॅबमध्ये तयार केलेल्या हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरपने किती लोकांना ओबेसिटी व इन्शुलिन प्रॉब्लेम्स सहन करावे लागले असतील. ही उदाहरणं फार बेसिक कॉमन सेन्सची आहेत. मलातरी ह्यात काहीच चुकीचे वाटत नाही. मुलाला ऑटीझम होण्यापूर्वीपासून मी व्हाईट ब्रेड खाणे बंद केले, पण कदाचित होल व्हीट ब्रेड देखील चुकीचेच आहे. कारण सध्याच्या गव्हाची प्रत. जर शेतातल्या रोपांवर, गव्हावर खताची फवारणी करताना प्रॉपर मास्क लावला जातो जेणेकरून ते नाका-तोंडावाटे अजिबात शरीरात जाऊ नयेत, तर ते त्या पेस्टीसाईड फवारलेल्या भाज्या/ग्रेन्स खाण्याचे किती दुष्परिणाम असतील? त्या भाज्या कितीही धुतल्या तरी त्या पेस्टीसाईडस विरहीत आहेत याची काय गॅरंटी? ज्या ज्या सिझनला जे फळ येते त्याव्यतिरिक्त सिझनला जेव्हा फळे मिळतात दुकानात तेव्हा ती जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी त्यावर किती पेस्टीसाईड्स असतील? त्यामुळे ऑर्गॅनिक व सिझनल खाणे हे महत्वाचे आहे.
ज्याचे शरीर सुदृढ आहे, ज्याची इम्युन सिस्टीम मजबूत आहे, ज्यांच्याकडे उपयुक्त जीवजंतू शरीरात आहेत, त्यांचयसाठी कदाचित वरच्या गोष्टींने इतका वाईट फरक पडणार नाही. परंतू ऑटीझम स्पेक्ट्रमवरील मुलांकडे उपयुक्त जीवजंतू कमी असतात, ग्लुटेन्स सेन्सिटीव्हिटी असताना देखील खाल्लेल्या व्हीटमुळे इन्फ्लॅमेशन झाले असेल, तर अशा दुषित भाज्या,फळे खाल्ल्यानंतर ती टॉक्सिन्स त्यांचे शरीर पूर्णपणे शरीराबाहेर टाकू शकत नाही. ‘लीकी गट’ असेल तर हेच टॉक्सिन्स त्यांच्या ब्लडमधून ब्रेनमध्ये पण जाऊ शकतात. व त्यामुळेच हे सर्व बिहेविअर प्रॉब्लेम्स, ऑटीझमलाईक सिम्प्टम्स दृष्टीला पडतात. मग असे होऊ नये, म्हणून त्यांना उपयुक्त जीवजंतू देण्यासाठी प्रोबायॉटीक सप्लिमेंट देणे, इन्फ्लॅमेशन होऊ नये म्हणून ग्लुटेन फ्री आहार देणे हे केल्यास पॉझिटीव्ह फरक पडलेला दिसत असेल तर हे मान्य का होऊ नये? बर यासाठी सर्व ब्लड तपासण्या देखील करतात हे डॅन डॉक्टर्स.. (डॅन डॉक्टर्स म्हण्जे कोणी वैदू नाही. प्रॉपर मेडीसिन शिकलेले एम्डी झालेले परंतू नवीन वाटांना सामोरे जाणारे डॉक्टर असतात ते.)
समोर आकडे(रिझल्ट) दिसत असताना त्या मुलाचे बिहेविअर मधले पॉझिटीव्ह बदल दिसत असताना ते अमान्य करणे हे माझ्यासाठी अनाकलनिय आहे. हा विषय खूप व्हास्ट आहे. अजुन मोस्ट डॉक्टर्स ह्या वाटेला जात नाहीत म्हणून ही पद्धती चुकीछी अथवा क्वॅक हे मला पटत नाही. ज्यांना हे बेसिक चेंजेस करून फरक पडतो, मुलांचय स्पीचमध्ये सुधारणा होतात ते काय आहे मग? को-इन्सिडन्स? आय डोन्ट थिंक सो.