0

Gluten or Food Sensitivities – यांमुळे स्वमग्न मुलांवर होणारा परीणाम

बायोमेडीकलच्या दोन लेखांमध्ये ग्लुटेन अथवा इतर फुड सेन्सेटीव्हिटीबद्दल मोघम वाचले. आता नीट पाहू. सपोज एखाद्याला दाण्याची / एगची अ‍ॅलर्जी आहे. ते खाल्ल्याने रॅश येतो, ओठ सुजतात, क्वचित श्वासनलिका सुजून श्वास घ्यायला त्रास होतो. ती व्यक्ती काय करेल? ते पदार्थ टाळेल , हो ना? की असं काही नसतं , ही क्वॅकरी आहे, फॅड आहे म्हणून तेच पदार्थ खाऊन स्वतःला त्रास करून घेईल? याचे उत्तर नाहीच येईल. ते पदार्थ तो माणुस टाळायला बघेल. या अ‍ॅलर्जीजबद्दल मी पुढील लेखात नीट लिहीले आहे. पण थोडक्यात ग्लुटेन सेन्सिटीव्हिटीने त्या व्यक्तीला दृश्य रॅश वगैरे त्रास नसेल परंतू बिहेविअर चेंजेस होत अस्तील तर त्या व्यक्तीने ग्लुटेन टाळावे हेच बरे. नाही का? मग ब्लड टेस्ट करून ग्लुटेन सेन्सिटीव्हिटी आहे का हे शोधता येत असेल तर त्यात क्वॅकरी काय आहे? विचार करा. इतके व्हॅक्सिनेशन स्केज्यूल का असते? फ्लू चा शॉट आपण लहानपणी घेतला होता का कधी? मला एव्हढंच म्हणायचे आहे, हे जे क्वेश्चनिंग आपण नवीन पद्धतींवर करतो तसेच रूळलेल्या पद्धतींना क्वेश्चन केले पाहीजे. साधे डाएट चेंजेस करण्यामध्ये एखाद्या डॉक्टरला झटकून टाकण्याइतके गैर काय वाटते? सपोज मी चायनामध्ये राहून त्या डॉक्टरला सांगितले की मी ऑक्टोपस खाणार नाही (फॉर व्हॉटेव्हर रिझन) तर म्हणेल का, नाही तुम्ही खाल्लाच पाहीजे. ऑक्टोपस न खाल्ल्याने काहीही वेगळे फायदे मिळत नाहीत. अरे पण आम्ही नाहीच खात! तसेच आम्ही ठरवले की आम्ही जीएफ्/सीएफ डाएट खाणार, तर कोणाला त्यात आडकाठी करण्याची गरज का वाटावी? आम्ही काही मुलाला उपाशी ठेवणार नाही आहोत. उलट जास्तीत जास्त पोषक अन्न कसं जाईल हे बघत आहोत. सेव्हन सीज नावाच्या कॉड लिव्हर गोळ्या मी देखील वाढीच्या काळात घेतल्या. मग फिश ऑईल्/कॉड लिव्हर ऑईलचे सप्लिमेंट देण्यात काय प्रॉब्लेम आहे? आणि त्याने आय काँटॅक्ट सुधारतो, समज सुधारत आहे असं जर पालक येऊन सांगत असतील तर त्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे?
ज्या गव्हावर आपण इतका विश्वास टाकत आहोत, तो गहू गेल्या काळात किती बदलला हे समजून घ्यायचे असेल तर ‘व्हीट बेली’ नावाचे पुस्तक वाचा. काही जनरेशन्स पूर्वी जो उत्तम प्रतीचा गहू मिळायचा तसा तो आता नसतो.सध्या विविध पेस्टीसाईड्स असतात. हे मी विशेषतः अमेरिकेचे बोलत आहे. भारतात नक्की काय परिस्थिती आहे माहीत नाही. परंतू इथे पूर्वी मिळणारी चिकन अ‍ॅव्हरेज साईजची असायची, आता चिकन ऑन स्टेरॉईड्स वाटते. पूर्वी गाईम्हशी चारा खायच्या, आता त्यांना कम्पल्सरी कॉर्न खायला घातला जातो जे अनैसर्गिक आहे, त्यामुळे जे दूध मिळते तेदेखील पूर्‍वी मिळणार्‍या दुधाइतके पोषक नसते. शिवाय गाईंना ग्रोथ हार्मोन्स टोचलेले असतात, असे दूध प्यायल्याने सध्याच्या जनरेशनमध्ये अगदी लहान मुली वयात येण्याचे प्रमाण वाढले आहे. साखरेपेक्षा स्वस्त व पूर्णपणे लॅबमध्ये तयार केलेल्या हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरपने किती लोकांना ओबेसिटी व इन्शुलिन प्रॉब्लेम्स सहन करावे लागले असतील. ही उदाहरणं फार बेसिक कॉमन सेन्सची आहेत. मलातरी ह्यात काहीच चुकीचे वाटत नाही. मुलाला ऑटीझम होण्यापूर्वीपासून मी व्हाईट ब्रेड खाणे बंद केले, पण कदाचित होल व्हीट ब्रेड देखील चुकीचेच आहे. कारण सध्याच्या गव्हाची प्रत. जर शेतातल्या रोपांवर, गव्हावर खताची फवारणी करताना प्रॉपर मास्क लावला जातो जेणेकरून ते नाका-तोंडावाटे अजिबात शरीरात जाऊ नयेत, तर ते त्या पेस्टीसाईड फवारलेल्या भाज्या/ग्रेन्स खाण्याचे किती दुष्परिणाम असतील? त्या भाज्या कितीही धुतल्या तरी त्या पेस्टीसाईडस विरहीत आहेत याची काय गॅरंटी? ज्या ज्या सिझनला जे फळ येते त्याव्यतिरिक्त सिझनला जेव्हा फळे मिळतात दुकानात तेव्हा ती जगवण्यासाठी, टिकवण्यासाठी त्यावर किती पेस्टीसाईड्स असतील? त्यामुळे ऑर्गॅनिक व सिझनल खाणे हे महत्वाचे आहे.
ज्याचे शरीर सुदृढ आहे, ज्याची इम्युन सिस्टीम मजबूत आहे, ज्यांच्याकडे उपयुक्त जीवजंतू शरीरात आहेत, त्यांचयसाठी कदाचित वरच्या गोष्टींने इतका वाईट फरक पडणार नाही. परंतू ऑटीझम स्पेक्ट्रमवरील मुलांकडे उपयुक्त जीवजंतू कमी असतात, ग्लुटेन्स सेन्सिटीव्हिटी असताना देखील खाल्लेल्या व्हीटमुळे इन्फ्लॅमेशन झाले असेल, तर अशा दुषित भाज्या,फळे खाल्ल्यानंतर ती टॉक्सिन्स त्यांचे शरीर पूर्णपणे शरीराबाहेर टाकू शकत नाही. ‘लीकी गट’ असेल तर हेच टॉक्सिन्स त्यांच्या ब्लडमधून ब्रेनमध्ये पण जाऊ शकतात. व त्यामुळेच हे सर्व बिहेविअर प्रॉब्लेम्स, ऑटीझमलाईक सिम्प्टम्स दृष्टीला पडतात. मग असे होऊ नये, म्हणून त्यांना उपयुक्त जीवजंतू देण्यासाठी प्रोबायॉटीक सप्लिमेंट देणे, इन्फ्लॅमेशन होऊ नये म्हणून ग्लुटेन फ्री आहार देणे हे केल्यास पॉझिटीव्ह फरक पडलेला दिसत असेल तर हे मान्य का होऊ नये? बर यासाठी सर्व ब्लड तपासण्या देखील करतात हे डॅन डॉक्टर्स.. (डॅन डॉक्टर्स म्हण्जे कोणी वैदू नाही. प्रॉपर मेडीसिन शिकलेले एम्डी झालेले परंतू नवीन वाटांना सामोरे जाणारे डॉक्टर असतात ते.)
समोर आकडे(रिझल्ट) दिसत असताना त्या मुलाचे बिहेविअर मधले पॉझिटीव्ह बदल दिसत असताना ते अमान्य करणे हे माझ्यासाठी अनाकलनिय आहे. हा विषय खूप व्हास्ट आहे. अजुन मोस्ट डॉक्टर्स ह्या वाटेला जात नाहीत म्हणून ही पद्धती चुकीछी अथवा क्वॅक हे मला पटत नाही. ज्यांना हे बेसिक चेंजेस करून फरक पडतो, मुलांचय स्पीचमध्ये सुधारणा होतात ते काय आहे मग? को-इन्सिडन्स? आय डोन्ट थिंक सो.

0

Endless to-do list

autism_to_do_list

 

 1. GF/CF Diet
 2. mB12
 3. Zinc
 4. Omega 3
 5. Amino Acids
 6. OT Exercise & play strategies
 7. Sensory/ OT massage
 8. Mahanarayan Oil Massage
 9. Essential Oil Massage
 10. Epsom Salt bath
 11. Honey+Lime Massage to tongue & gums
 12. Deep pressure on Joints
 13. Sensory brush Massage
 14. Weighted Blankets
 15. Make sensory corner
 16. Hyperbaric Oxygen Therapy
 17. Son Rise
 18. Speech strategies from the book “More than words”
 19. OT : ‘Out of sync child’ & ‘out of sync child has fun’
 20. Make schedule board
 21. Buy AAC Apps
 22. Make more PECS
 23. PECS Games
 24. PECS About me/ Family
 25. PECS ‘how am I feeling’
 26. Find classical music
 27. Autism research
 28. Read ‘ Children with Starving brain’
 29. Read Bock book ‘ Healing childhood Epidemics:4A’
 30. Read & Follow ‘The Autism Book’ again
 31. Read Jenny McCarthy’s books again
 32. Find more about Hippotherapy
 33. Find special classes for swimming
 34. Schedule Playtime in Special Gym
 35. Potty Training
0

बायोमेडीकल टेस्ट्स व रिझल्ट्स

मागील लेखात आपण वाचले की बायोमेडीकल्/डॅन्/मॅप्स डॉक्टरच्या सांगण्यानुसार बर्याच ब्लड टेस्ट्स करून मग अपॉईंटमेंट दिली ती रिझल्ट्स डिस्कस करण्याची. त्याबद्दल लिहीतेच आहे, परंतू थोडी बॅकग्राउंड बायोमेडीकलबद्दल द्यावी असे वाटते.

बायोमेडीकल हा काय प्रकार? तर मुख्यतः ऑटीझम हा फार वादग्रस्त मुद्दा आहे. मेडीकल फिल्डमध्ये ऑटीझम हा जेनेटीक म्युटेशनने होतो, तसेच काही वातावरणातील फॅक्टर्सदेखील काराणीभूत असतात असे मानले जाते. थोडक्यात ऑटीझम बरा होत नाही. परंतू डॉक्टर्समध्येच एक फळी आहे (डॅन्/मॅप्स) जे मानतात की ऑटीझम हा पर्यावरणातील फॅक्टर्सने होऊ शकतो तसेच व्हॅक्सीनेशननेही बर्‍याच मुलांमध्ये बदल होतात – जे ऑटीझमसारखी लक्षणं दाखवतात. सायन्स बघायला गेले – तर जगात कितीतरी मुलांना व्हॅक्सिनेशन केले जाते, सर्व मुलांना का ऑटीझम होत नाही? याचा अर्थ व्हॅक्सिनेशनने ऑटीझम होत नाही. तर दुसरी फळी म्हणते – काहीच मुलांची इम्युन सिस्टीम आधीच कमकुवत असते, त्यांच्यात चांगले बॅक्टेरिआज कमी असतात- ते वरवर पाहता हेल्दी असतात! परंतू जेव्हा व्हॅक्सिनेशनसाठी लाईव्ह व्हायरस आणि मुख्यतः जोडीने दिलेल्या व्हॅक्सिनेशनमध्ये एकापेक्षा अनेक व्हायरस शरीरात सोडले जातात तेव्हा ज्या काही बालकांची इम्युन सिस्टीम हेल्दी नसते त्यांच्यासाठी हे व्हॅक्सिनेशन म्हणजे ऑटीझमची लक्षणं दिसण्यासाठीचा एक ट्रिगर असतो. त्यामुळेच सर्व मुलांना नाही, परंतू काही मुलांना व्हॅक्सिनेशन दिल्या दिल्या अतिशय सिव्हिअर रिअ‍ॅक्शन होऊन त्यानंतर त्यांची पर्सनालिटी बदललीच हे ठामपणे सांगणारे बरेच पालक इंटरनेटवर्/पुस्तकांतून सापडतात. यात मुख्य कल्प्रिट बर्याचदा असतो तो एक ते दिड वर्षाच्या आसपास दिली जाणारी लस Measles, mumps, rubella (MMR). सीडीसी (सेंटर फॉर डिसिज कंट्रोल & प्रिव्हेंशन) यांचे ऑफिशिअल वेळापत्रक तुम्हाला इथे मिळेल. -> http://www.cdc.gov/vaccines/schedules/hcp/imz/child-adolescent.html

ओके, मुळात व्हॅक्सिन्स व ऑटीझम हा अतिशय वादाचा मुद्दा आहे. मला त्यात पडायचे नाही. पण माझे मत विचाराल तर मी एकच सांगीन. माझा मुलगा सव्वा वर्षापर्यंत पिडीयाट्रिशिअनच्या मते ब्युटीफुली ग्रो होत होता. साधं सर्दी पडसं देखील त्याला झाले नाही इतकी त्याची फिजिकल हेल्थ चांगली होती. छान हसरा, अफेक्शनेट, सर्व रिस्पॉन्सेस बरोबर देणारा व सर्वात महत्वाचे, जे देऊ ते व्यवस्थित तोंड उघडून खाणारा होता. त्याला सर्वात पहिलं आजारपण आले ते म्हणजे सव्वा-दिड वर्षाचा असतानाच्या सुमारास दिलेल्या व्हॅक्सिनच्या आठवड्यात. सिव्हिअर रिअ‍ॅक्शन. कमी न होणारा ताप, उलट्या.. इतकं की कधीही डॉक्टरांची पायरी आजारपणासाठी न चढलेलो आम्ही डिरेक्टली इमर्जन्सीमध्ये गेलो. त्यानंतर मुलाची पर्सनालिटी बदलली ती बदललीच. त्याआधी जरासा अस्पष्ट शब्द उच्चारणारा , बॅबलिंग करणारा या मुलाची बोलती बंद झाली. चांगला इंटरॅक्ट करणारा, डोळ्यात बघून रिस्पॉन्स देणारा कुठेतरी खिडकीतून बाहेर टक लाऊन बघत बसे. खेळणी ओळीने लावत बसे. कार्स उलट्या ताकून चाकांशी खेळत बसे. सर्व काही खाणारा (अगदी पोहे,उपमा,पालकाची भाजी, कोबीची भाजी,बेगल्स, पॅनकेक्स, चिकन व फिश देखील खायचा ) हा मुलगा खाण्यासाठी तोंडच उघडेना. अतिशय प्रमाणार ओरल अ‍ॅव्हर्जन्स – ज्याबरोबर आम्ही अजुनही लढतो. परिणामी अथक २ वर्षांच्या प्रयत्नाने मुलगा दोन वेळेस खातो. काय? तर पराठा/थालिपीठ किंवा भात. हे आमचे सर्वात सक्सेसफुल दिवसातले खाणे. नाहीतर आहेच पिडियाशुअर.

तर हे सांगायचा मुद्दा असा की सायन्स काय सांगते ते सांगेल. पण आमच्या डोळ्यासमोर झालेला हा बदल आम्हाला या सगळ्या प्रकरणाच्या दुसर्‍या बाजून बघायला भाग पाडतो. नेहेमीचे डॉक्टर थेरपीज सुचवतात परंतू खात्री देत नाहीत रिकव्हरीची. मग जरा का जीएफ्/सीएफ डाएट्स अथवा कुठल्या सप्लिमेंट्सने लगेचच चांगला फरक दिसत असेल तर तुम्ही विश्वास का ठेऊ नये? शेवटी आम्ही पालक आहोत. आमच्यासाठी आमच्या मुलाचे भले हे एकच ध्येय आहे. कशानेही तो बदल झाला तर हवाच आहे आम्हाला! इंटरनेटवर अशा पालकांना ब्लेम करणारेही लोकं आहेत! की “तुम्ही तुमच्या मुलांना ती आहेत तसं प्रेम करत नाहीत, अ‍ॅक्सेप्ट करत नाहीत.” हे चूकीचे आहे. आम्ही अ‍ॅक्सेप्ट केले नाही तर रोजचा दिवस कसा पार पडणार? Of course, I love my child the way he is. But I also hate the way he struggles with very basic skills every step of the way .. And if Biomedical or any sensible methodology is going to be helpful in some way, I am going to try it out.

एनीवे, तर मी आता मूळ मुद्द्याकडे वळते. टेस्ट्सचे रिझल्ट्स.
सर्वच्या सर्व पॅरामीटर्स इकडे देणे अशक्य आहे. त्यामुळे जनरल आयडीया देते. (मला यातील ८०% नावं व गोष्टी माहीत नाहीत. दर वेळेस पुस्तक घेऊन रिपोर्ट वाचावा लागतो. हे काय आहे, याचे काय मिनिंग इत्यादी. मी येथे फक्त नावं देते. अर्थ मलाही माहीत नाही बरेच. येथील डॉक्टर लोकांना काही याबबत माहीती शेअर करायची असेल तर वेलकम!)

पहिला रिपोर्ट माझ्या हातात आहे, त्यात आहे

कोलेस्टरॉल(एल्डीएल्,एचडीएल इत्यादी), Lipoprotein Particles and Apolipoproteins, Inflammation/Oxidation, Myocardial structure/Stress/function, Platelets, Lipoprotein Genetics, Platelet Genetics, Coagulation Genetics, Metabolic (TSH, homocystein, vit B, vit D, RBC Folate) , Renal (Creatinine) Sterol Absorption Markers, Sterol Synthesis Markers, Glycemic control, insulin resistance, Beta Cell function, electrolytes(Na+,K+,Cl-,Co2, Calcium), Liver(AST, ALT,bilirubin), Others(Albumin, total protein, iron, ferritin) Thyroid(TSH, T4,T3, T4 free, reverse T3) , CBC with differential, Omega 3 Fatty Acids, Omega 6 Fatty Acids, Other fatty acids.

-> या रिपोर्टवरच्या कमेंट्समध्ये डॉक्टर असं म्हणतो की:

biomedical3

biomedical2

थोडक्यात, ओमेगा ३ सप्लिमेंट्स व मिथायलेशनची गरज आहे. म्हणजे Methylcobalamin (बी१२ चा एक प्रकर्र) याची गरज आहे.

दुसर्‍या रिपोर्टमध्ये आहेत खालील गोष्टी :

biomedical 4

biomedical5

व्हिटॅमिन सी, व्हीटॅमिन डी याचबरोबर डॉक्टरांनी एझाईम्स, काही इतर सप्लिमेंट्स सांगितले आहेत. तसेच मुलाला Mitochondria नावाचाही प्रकार असल्याचे सांगितले त्यामुळे त्यावरही एक औषध सांगितले आहे.

तिसर्‍या रिपोर्टमध्ये आहे IgG Food Antibody Assessment & IgG Spice Profile, IgE Inhalants profile, IgE Mold profile, Celiac & Gluten Sensitivity..

-> तुम्हाला फुड अ‍ॅलर्जीज माहीतीच असतील.उदा: सतत पाहण्यात, ऐकण्यात आलेली पीनट्स वा इतर नट अ‍ॅलर्जी. मग त्यात श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो तर कधी स्वेलिंग, कधी हाईव्ह्ज(रॅशेस) होते. हा जो प्रकार आहे तो IgE (or immunoglobulin E) यामध्ये मोडतो. हा जो दुसरा IgG (Immunoglobulin G)हा जरा सटल प्रकार आहे, त्यामध्ये तुम्ही अमुक एक पदार्थ घेतल्यावर तुम्हाला अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन अ‍ॅज सच रॅशेस वगैरे होणार नाही, परंतू काही ना काहीतरी बिहेविअर चेंजेस, हायपर अ‍ॅक्टीव्हिटी, ब्लोटींग, डोकेदुखी असे सिम्प्टम्स दिसू शकतात. थोडक्यात फुड सेन्सिटीव्हिटी. अ‍ॅलर्जीमध्ये फुड बरोबरच मोल्ड्स, पोलन याची अ‍ॅलर्जी तुम्ही ऐकली असेल. तो झाला IgE Inhalants profile, IgE Mold profile. पदार्थांमध्येच मसाले देखील आले. तेई टेस्ट करण्यात आले – IgG Spice Profile मध्ये. याचबरोबर सेलिआक डिसिजची / ग्लुटेन सेन्सिटीव्हीटीचीही टेस्ट घेण्यात आली. (येथे अधिक माहीती वाचा) माझ्या मुलाला मोल्ड , पोलन अशी किंवा रॅश्/स्वेलिंग होणार्‍या अ‍ॅलर्जीज नाहीत. परंतू चिक्कार फुड सेन्सेटीव्हिटीज सापडल्या. त्याचा तक्ता देते.

biomedical 5

biomedical 6

biomedical7

येथे लाल रंग अथवा ३+ जिथे लिहीले आहे ते सगळं माझ्या मुलासाठी अपायकारक आहे. ते पदार्थ निदान ६ महिने तरी अ‍ॅब्सोल्युटली टाळायचे आहेत. त्यानंतर अगदी थोड्या प्रमाणात रि-इंट्रोड्युस करून त्याची रिअ‍ॅक्शन कशी येते ते पाहून पुढील कोर्स ऑफ अ‍ॅक्शन ठरवावी लागेल. पण तुम्ही पाहीलंत तर दिसेल, आपल्या भारतीय स्वयपाकातले कितीतरी पदार्थ त्याला चालणार नाहीत. उदा: म्हशीचे दूध, दही, बीट्स, कोबी, काकडी, लसूण, ढोबळी मिरची, लेट्युस, कांदा, रताळे, पालक, टोमॅटो, ग्लुटेन (पोळी, ब्रेड), गहू, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, प्लम… परंतू फिशचे बरेचसे प्रकार व पोल्ट्री त्याला चालणार आहे जी तो मुळीच खात नाही. बाकीचे नॉन्व्हेज प्रकार आम्हीदेखील खात नसल्याने घरी बनले अथवा आणले जात नाहीत.

ग्लुटेन सेन्सिटीव्हिटीच्या रिपोर्टमध्ये देखील ग्लुटेन/व्हीटला ३+ असल्याने तेही टाळण्याची गरज आहे. मी गेले ३-४ महिने त्याची पोळी कम्प्लिट बंद केली आहे. 🙁 आणि माझ्या मुलाला पोळी खूपच आवडते. थोडासा समजूतीत फरक वाटतो पण अजुन आम्ही पूर्णपणे १००% जीएफ्/सीएफ डाएट करत नसल्याने याबद्दल मी नंतरच लिहीलेले बरे.

अशा रीतीने वरील रिपोर्टसवरून एक कळते, की आमच्या मुलाला जीएफ्/सीएफ डायेट व काही सप्लिमेंट्स (ओमेगा ३, एम्बी१२, झिंक) याचा फायदा होऊ शकतो. आता दुसरा अडथळा येतो. आमचा मुलगा मुळीच औषध घेत नाही. त्याला दोन माणसांनी पकडले तर तिसरा कसातरी औषध तोंडात ढकलू शकेल – तेही तो थुंकून टाकतो. आम्हाला सप्लिमेंट्स रोजच्या रोज देणे सध्यातरी स्वप्नवतच आहे. परंतू मी जेव्हा शक्य आहे व मुलाच्या मूडनुसार झिंक वगळता सप्लिमेंट्स देऊन पाहीली आहेत. ओमेगा ३ व एम्बी१२ याचा फायदा बोलण्यात वगैरे झाला नसला तरी आय काँटॅक्ट सुधारण्यात मात्र झाला. अचानक आपण जे बोलत आहोत ते मुलापर्यंत पोचत आहे असा दिलासा कुठून तरी आम्हाला मिळाला, मेबी त्याच्या एक्स्प्रेशन्सवरुन? हे सगळं जरी असलं तरी औषधं जर त्याच्या पोटात गेलीच नाहीत तर काय फायदा व तोटा. इथे आम्ही अजुनही स्ट्रगल करतो. त्याला अजुन इतकी समज नाही, की आम्ही सांगितले हे तुझ्यासाठी चांगले आहे – घे, तर तो गपचुप घेईल. त्यासाठी बहुधा थोडी वाट पाहावी लागेल. परंतू वरील रिपोर्ट्सवरून व मुलाच्या रिस्पॉन्सवरून आम्हीदेखील म्हणू शकतो की याचा फायदा होऊ शकतो!

अजुन एक मार्ग आहे जे तुम्ही करत आहात त्याचा किती फायदा होतो हे बघण्याचा. http://www.surveygizmo.com/s3/1329619/Autism-Treatment-Evaluation-Checklist-revised येथे एक चेकलिस्ट्/प्रश्नपत्रिका आहे. वरची कुठलीही मेडीकल ट्रीटमेंट चालू करण्याआधी व नंतर तुम्ही प्रश्नमालिका सोडवून स्कोअर काढला तर ऑटीझमची लक्षणे कमी जास्त होत आहेत किंवा कसे हे कळून येते.

मुलाच्या रिपोर्टवरून तसेच माझ्या काही लक्षणांवरून मलाही जाणवले की मला देखील फुड सेन्सिटीव्हिटीज असणार आहेत काही. मी काहीदिवस जीएफ्/सीएफ डाएट ट्राय केले असता मला अतिशय चांगले रिझल्ट मिळाले. पोटभर जेऊनही हलके वाटणे – सुस्ती न येणे, पचनसंस्था सुधारल्याचे समजणे इत्यादी फरक जाणवले. शिवाय मुलाच्या थेरपीस्ट्स, स्पीच थेरपीस्ट यांच्याशी बोलताही असंच समजले की ग्लुटेन सेन्सिटीव्हिटी इज अ बिग डील. तुम्ही ते ट्राय केले तर फरक जाणवेल नक्की. त्यामुळे ती एक आशा आहेच. अतिशय कष्टाचा रोड आहे हा, पण मी त्या वाटेला नक्कीच जाणार!! 🙂

ह्या सगळ्या टेस्ट्स आम्ही करून आता वर्ष होईल. आमचं मुळात तो खाण्याबाबतीत खूप स्ट्रगल असल्याने जीएफ्/सीएफ डायेट ट्राय करण्याचा प्रश्नच नव्हता. तो काहीच खात नाही तर निदान त्याला आधी २ वेळेस खाण्याची सवय लागूदे या विचाराने गेल्या वर्ष-२वर्षाचा बराच वेळ गेला. नेहेमीच्या डॉक्टरांनी जीएफ्/सीएफ हाणून पाडल्याने आम्ही परत कन्फ्युजनमध्ये गेलो. अशा रीतीने हो नाही हो नाही करत परत एकदा जीएफ्/सीएफची सुरवात गेल्या ३-४ महिन्यांपासून केली आहे. नशीब जीएफ्/सीएफ मध्ये भात येतो.
सप्लिमेंट्स जेव्हढी जायला पाहीजेत तेव्हढी गेली नाहीत, परंतू त्याचा नव्याने प्रयत्न चालू केला आहे. हा खूप मोठा प्रवास आहे. परंतू याचबरोबर आम्ही बाकीच्या थेरपीज( स्पीच, एबीए, ओटी) अर्थातच चालू ठेवली आहे. भारतातून आईबाबा, नातेवाईक यांच्याकडून होमिओपथी, फ्लॉवर रेमेडी याही गोष्टी कळतात. काही औषधं घरात आहेतही, परंतू रात्र थोडी सोंगं फार सारखे, आमचा मुलगा छोटा अन त्याचे मेडीसीन्/सप्लिमेंट कॅबिनेटच मोठे असा प्रकार होतो. त्याखेरीज त्याचे रूटीन अतिशय व्यस्त असल्याने हे सगळं जमवणे अवघड जाते. परंतू हॉलिस्टीक अ‍ॅप्रोचचाच फायदा होईल असं आम्हाला वाटते.