‘Au-some’ books : Chicka Chicka Boom Boom

by : Bill Martin Jr (Author), John Archambault (Author), Lois Ehlert (Illustrator)     Alphabets ! एके दिवशी नारळाच्या झाडावर चढायची शर्यत लावतात. एक एक करत सगळे जातात वर परंतू धाडकन खाली येतात. मग परत शर्यत चालू. इतक्याश्या स्टोरीलाईनचे हे क्यूट पुस्तक! 🙂 You can get it here :Chicka Chicka Boom Boom

‘Au-some’ Toys – Hopper Ball

Ball Hopper ! हे सगळ्यात जास्त रिइन्फोर्सिंग खेळणं आहे आमच्या घरातले. माझ्या मुलातच नव्हे तर बहुतांशी स्पेक्ट्रमवरील मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. तिचा सत्कारणी वापर केला नाही तर त्यांना खूप अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे ही हॉपर बॉल सारखी खेळणी अगदी उपयोगी पडतात. पालक/केअरटेकर/थेरपिस्ट यांना तितके जास्त कष्ट नाही पडत परंतू मुलांची भरपूर एनर्जी खर्ची पडते. माझ्या… Read More »

ऑटीझम व ओसीडी ( ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर)

ऑटीझम कमी की काय म्हणून बर्‍याचदा ऑटीझमबरोबर ओसीडी येतो. माझ्या मुलात बराच काळ असं काही दिसले नाही परंतू गेल्या वर्षभरात हळूहळू ओसीडीने शिरकाव केला आहे. ओसीडी म्हणजे काय? तर ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर. नाव बोलकं आहे. कुठल्या तरी गोष्टीचे तसेच विचारांचे ऑब्सेशन तर त्या ऑब्सेशनच्या बरोबरीने येणारी एखादी कम्पल्सिव्ह कृती. अगदी क्लासिक उदाहरण म्हणजे, काही लोकांना… Read More »

‘Au-some’ Toys : Kidoozie Foam Pogo Jumper

माझा मुलगा ३.५ वर्षाचा झाला तरी अजुन दोन्ही पाय उचलून उडी मारत नाही. त्याला मुळातच ते जमत नाही की तो घाबरतो हे कळायला मार्ग नाही. परंतू तो उडी मारत नाही हे खरं. त्यामुळे मी त्याला आजकाल त्याच्याबरोबरीने किंवा त्याला धरून उड्या मारायला शिकवत असते. पण फारसा उपयोग होत नव्हता. जेव्हा मला हे खेळणं दिसले, तेव्हा… Read More »

‘Au-some’ Books : “Sheep in a Jeep” by Nancy E. Shaw

हे एक खूपच गोड पुस्तक आहे! इतकी सुंदर लय आहे शब्दांना. यमकं अगदी नैसर्गिकपणे जुळवल्यासारखी आहेत. शब्दांबद्दल उत्सुकता निर्माण करण्याचे काम नक्की पार पाडतं हे पुस्तक. अजुन माझ्या मुलाला पूर्ण गोडी कळायची आहे खरंतर. पण आम्हाला देखील इतकं हसू फुटतं त्याला वाचून दाखवताना. वेड्या शीप धांदरटपणे गाडी चालवतात स्टीप हीलवर. मग स्टिअर करायला विसरतात, समोर… Read More »

ऑटीझम स्पेशल अ‍ॅक्टीव्हिटीज व कोपिंग टेक्निक्स

प्रत्येकालाच एक कम्फर्ट झोन असतो. ती अमुक एक गोष्ट केली की बरं वाटतं, किंवा अमुक एक पदार्थ खाल्ला, कॉफी प्यायली की बरं वाटतं. अशा सारखेच काही कम्फर्ट झोन्स ऑटीझम असलेल्या मुलांचेही असू शकतात. फक्त फरक हा आहे, की ती मुलं आपल्याला येऊन सांगू शकत नाहीत. त्यामुळे केअरगिव्हरलाच त्यांच्या दृष्टीने विचार करून वेगवेगळ्या अ‍ॅक्टीव्हिटीज कराव्या लागतात.… Read More »

ऑटीझमचे फायदे

शीर्षक वाचून दचकायला झाले ना? मलाही लिहीताना अवघड गेले. पण मुलाच्याबरोबरीनेच माझाही पर्स्पेक्टीव्ह बदलत चालल्याचे लक्षण असावे हे. मी हा लेख लिहीत आहे याचा अर्थ असा नाही की सगळं आलबेल आहे. ऑटीझमच्या बरोबर येणारे त्रास काही कुठे जात नाहीत. इन फॅक्ट त्या त्रासाबद्दलच मी इतके दिवस लिहीत आहे इतक्या लेखांमधून. पण आज जरा वेगळ्या अँगलने… Read More »

जाणिवेचे झाड फोफावू द्या – Grow the Awareness!

२ एप्रिल हा ‘जागतिक ऑटीझम अवेअरनेस डे’ आहे, तर पूर्ण एप्रिल महिना हा ‘ऑटीझम अवेअरनेस मंथ’ आहे. लोकहो, अलिकडेच सीडीसीने ऑटीझमचा नवा प्रीव्हॅलंस रेट प्रकाशित केला तो आहे १:६८. म्हणजे ६८ पैकी एका मुलाला ऑटीझम होतो. यापूर्वीचा रेट १:८८ होता. खालील ग्राफ पाहील्यास फारच भीतीदायक माहीती दृष्टीस पडेल. इतके जास्त प्रमाण का वाढत आहे हा… Read More »

‘Au-some’ Books : “Goodnight Moon” by Margaret Wise Brown

 Goodnight Moon हे १९४७ साली प्रकाशित झालेले बेडटाईम स्टोरीबुक  आहे. जे मी आजही माझ्या मुलाला वाचून दाखवते. झोपायचे नसले तरी  माझा मुलगा दिवसातून कितीदा तरी हे पुस्तक घेऊन त्यातील चित्रं पाहात  बसतो. किती त्या पुस्तकाची कमाल आहे? इतके वर्षं झाली तरी अजुनही  इतका प्रभाव आहे. Very Impressive! माझ्या मुलाला तर कायम हे पुस्तक आठवणीत राहील… Read More »

‘Au-some’ Apps : PLAY LAB

                    Autism असलेल्या मुलं बर्‍याचदा Visual Learner असतात. म्हणजे पालकांनी खूप वेळा सांगूनही कदाचित त्यांना एखादी गोष्ट कळणार नाही. परंतू तीच गोष्ट व्हिडीओच्या स्वरूपात त्यांनी बघितली तर अगदी लक्षात राहील. या दृष्टीने हे Play Lab app सर्व अपेक्ष पूर्ण करते. विविध, रंग, आकार, आकडे इत्यादी सर्व concepts आकर्षक वेष्टणामध्ये… Read More »